फिरत रहातं ...
चक्रम करतं।
चक्रम म्हणजे ...
चक्रात अडकणारे म्हणजेच चक्रम.
चक्रमांच्या आयुष्यातल्या घटनांचा क्रम
त्यांच सारं आयुष्यं
चक्रच ठरवत असतं.
अनेक चक्रं अन अनेक चक्रम
प्रत्येक चक्रम... सतत ...स्वतःचे
त क्वचित इतर चक्रमांचे
चक्र फिरवत रहातो ...
फिरवत रहातो..हा हा हा ...
अन
चक्रम थांबले थकले पिचले
तरी ते फिरवत आलेली चक्रं
त्याना... तिथेच... फिरवतच ठेवतात
चक्र फिरतं ...
फिरत रहातं ...
चक्रम करतं।